सुर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चचा प्रेरणादायी उपक्रम : विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सुर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (SCPHR), बावधन, पुणे येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवाधारित शिक्षणावर भर दिला जातो. याच उपक्रमाचा भाग म्हणून बी.फार्मसी आणि डी.फार्मसीच्या नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फार्मा ट्रेड व्हिजिटद्वारे उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना औषध व्यवसायातील प्रत्यक्ष व्यवहार, वितरण प्रणाली आणि उद्योगातील कामकाजाची ओळख करून देणे हा होता. विद्यार्थ्यांनी सदाशिव पेठ, पुणे येथील नामांकित औषध वितरक संस्था – मॉडर्न डिस्ट्रीब्युटर, मॉडर्न मेडिसेल्स आणि आनंद मेडिकल डिस्ट्रीब्युटर – यांना भेट दिली.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना घाऊक औषध वितरण प्रणाली, सप्लाय चेन मॅनेजमेंट, कागदपत्र प्रक्रिया, नियमावली आणि औषध व्यापारातील जबाबदाऱ्या याबद्दल सखोल माहिती मिळाली. वितरकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून व्यापाराशी संबंधित मौल्यवान ज्ञान दिले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पुस्तकातील शिक्षणाला वास्तव जगाशी जोडण्याची संधी मिळवली. “आजच्या युगात केवळ अभ्यासू वृत्ती पुरेशी नाही; विद्यार्थ्यांमध्ये ‘स्ट्रीट स्मार्टनेस’ आणि ‘प्रोअॅक्टिव्ह’ दृष्टिकोन असणं गरजेचं आहे.
सुर्यदत्तमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वास्तव जगाशी जोडून, अनुभवाधारित शिक्षणाद्वारे त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो.” या अभ्यासदौर्याचे मार्गदर्शन डॉ. सरिका झांबड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
त्यांना सौ. श्रद्धा फाटक, कु. अपेक्षा राजगुरु आणि कु. नेहा कवळे यांनी सहकार्य केले. या भेटीत विद्यार्थ्यांनी उद्योगातील प्रत्यक्ष कार्यपद्धती पाहून शिकण्याची नवीन प्रेरणा घेतली. विद्यार्थ्यांना औषध वितरण व्यवस्थेचे व्यावहारिक ज्ञान मिळाल्यामुळे त्यांच्या फार्मसी शिक्षणात अधिक रस निर्माण झाला आणि उद्योगाशी निगडित समज दृढ झाली.
या उपक्रमाचे नियोजन व संपूर्ण मार्गदर्शन सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सौ. सुषमा चोरडिया यांच्या प्रेरणेतून करण्यात आले. सुर्यदत्तचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना ‘शिकताना अनुभव घेण्याची संधी’ देऊन त्यांना सक्षम, आत्मविश्वासू आणि उद्योगसिद्ध व्यावसायिक बनविण्याच्या दिशेने एक प्रभावी पाऊल ठरला आहे.
शिकताना अनुभव घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सुर्यदत्तमध्ये आम्ही पहिल्याच वर्षापासून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण देतो, जेणेकरून ते आपल्या क्षेत्राशी आवडीने जोडले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि योग्य संधी मिळाल्यास आपल्या देशातील विद्यार्थी आपल्या देशातच स्वाभिमानाने उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, हीच सुर्यदत्तची ठाम धारणा आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















