छाननीत तीन अर्ज रद्द : नगराध्यक्ष पदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी ८१ अर्ज कायम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा उत्साह चरमसीमेवर पोहोचला असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही प्रमुख आघाड्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या ८४ अर्जांपैकी छाननी प्रक्रियेत साठे अनुराधा प्रवीण, विद्या संदीप खामकर आणि बागडे विठ्ठल महादेव यांचे अर्ज रद्द झाले असून आता ८१ अर्ज कायम आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सकाळपासूनच नगरपरिषद कार्यालयाबाहेर दोन्ही आघाड्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. आलमप्रभू शहर विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत आणि माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करत होते, तर जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, धनाजीराव थोरात व बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केले.
अर्ज दाखल करताना ‘उमेदवारासोबत दोनच व्यक्तींना प्रवेश’ या नियमामुळे बाहेर थांबलेल्या कार्यकर्ते व पोलिसांमध्ये काही काळ किरकोळ वाद निर्माण झाला. निवडणूक अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून प्रशासनाने नगरपालिका परिसरातील दुकाने दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचा एक दिवसाचा व्यवसाय बंद राहिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
काही प्रभागांमध्ये एकाच पक्षाकडून अनेक अर्ज दाखल झाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबरनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली असून आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नगराध्यक्ष साठी अर्ज
गाढवे संयोगिता संजय
गाढवे संयोगिता संजय
गाढवे अमृता अंगदराव
गाढवे प्रगती तानाजी
मस्कर मीरा आबासाहेब
शिंदे प्राजक्ता आर्यनराजे
पोळ ज्योती बंडू
थोरात सत्वशीला धनाजीराव
साबळे देवशाला
















