आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बंडू आंदेकरच्या तीनही गुंड मुलांची पोलिसांनी काढली धिंड

Spread the love

पुणे : बंडू आंदेकर टोळीतील त्याच्या तीन गुंड मुलांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात धिंड काढली. आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी, घरझडतीच्या निमित्ताने पोलिसांनी या गुंडांना परिसरातून फिरविले.

कृष्णराज ऊर्फ कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आयुष कोमकर खुन प्रकरणात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली असून त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्याकडे देण्यात आला आहे.

तपासासाठी महत्त्वाचे असलेले कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांच्या घराची झडती घेण्यासाठी, या तिघांना पोलिसांनी त्यांच्या दहशतीचा परिसर असलेल्या नाना पेठ आणि गणेश पेठेतून फिरविले. यावेळी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने तसेच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दोन दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली असून त्यानंतर या तिघांना न्यायालयीन कोठडीतून कारागृहात रवानगी करण्यात आली.