प्रत्यक्ष ब्रँड स्टडीद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा अनुभव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड मास कम्युनिकेशन (SIMMC) आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी (SIBMT) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करोबार 4.0 – Brand Business Story: Brought to Life” हा अनुभवाधिष्ठित व्यवसाय मेळावा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले.
या व्यवसाय मेळाव्यात एमबीए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अग्रगण्य ब्रँड्सचा सखोल अभ्यास करून १८ थीमॅटिक स्टॉल्स सादर केले. एशियन पेंट्स, रॉयल एनफिल्ड, बीएमडब्ल्यू, डेकॅथलॉन, नेस्ले, कोका-कोला, गूगल, अमूल, मोतीलाल ओसवाल, एचडीएफसी, फ्लिपकार्ट, जे. डब्ल्यू. मॅरियट, फिजिक्सवाला आदी आघाडीच्या कंपन्यांचा त्यात समावेश होता.
उत्पादन निर्मिती, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, स्पर्धात्मक विश्लेषण, ग्राहक मानसशास्त्र, विक्री आणि आफ्टर-सेल्स सर्व्हिसेसपर्यंतच्या प्रत्येक व्यवसायिक टप्प्याचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास सादर केला. संशोधन, डेटा, बाजारपेठेचा प्रत्यक्ष अभ्यास आणि सर्जनशील सादरीकरणामुळे प्रत्येक स्टॉल अभ्यासपूर्ण आणि आकर्षक ठरला.
उपस्थित उद्योगतज्ञ, मानव संसाधन व्यावसायिक आणि बिझनेस लीडर्स यांनी विद्यार्थ्यांच्या विश्लेषणात्मक दृष्टिकोन, व्यवस्थापन कौशल्य, टीमवर्क आणि नेतृत्वाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे विशेष अभिनंदन करत त्यांनी उद्योगजगतासाठी अशा प्रायोगिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
सिद्धांत चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देत आश्वस्त केले की, “सूर्यदत्त संस्थेचे मार्गदर्शन सदैव विद्यार्थ्यांच्या सोबत असेल.” या मेळाव्याचे यश शैक्षणिक प्रमुख डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. हर्षद भडंगे आणि डॉ. सुनैत्रा गायतोंडे यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक, प्राध्यापक, पालक, माजी विद्यार्थी, उद्योगतज्ञ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रत्येक स्टॉलचे बारकाईने निरीक्षण करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे व व्यवस्थापन कौशल्याचे प्रशंसनीय मूल्यांकन केले.
“करोबार 4.0” मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवसायिक आढावा घेण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली. ब्रँड बिल्डिंग, मार्केटिंग, नेतृत्व, संवादकौशल्य आणि समस्या निराकरण यांसारख्या उद्योगजगतासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास होऊन विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने आणि तयारीने पुढे जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
बिझनेस टायकून वेगळं काम करत नाहीत, ते फक्त वेगळ्या पद्धतीने काम करतात. कारोबार 4.0 सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता, नवोन्मेषी विचार आणि उद्योगसिद्ध कौशल्ये विकसित होतात. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
आव्हाने हीच संधी असतात. प्रत्यक्ष अनुभवातून स्वतःला सिद्ध करा. सहाय्यक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा यांनी प्रेरणा देताना सांगितले, मजबूत नेटवर्क आणि स्वतःवरील विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. – सुषमा चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















