सोपल–राऊत गटाची प्रतिष्ठेची लढत : नगरपरिषदेनंतर बाजार समितीत नवा सामना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : नगरपरिषदेचा निकाल लागल्यानंतर बार्शी तालुक्याचे राजकारण आता थेट कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) निवडणुकीकडे झुकले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पायाशी असलेल्या या संस्थेची सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन दिग्गजांनी रणांगणात पुन्हा ताकदीनं पाय रोवले असून, या लढतीला राजकीय अस्तित्व आणि मान-सन्मानाचा प्रश्न असे स्वरूप प्राप्त झाले आहे.
नगरपरिषदेचा निकाल लागल्यानंतर बार्शी तालुक्याचे राजकारण आता थेट कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) निवडणुकीकडे झुकले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पायाशी असलेल्या या संस्थेची सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन दिग्गजांनी रणांगणात पुन्हा ताकदीनं पाय रोवले असून, या लढतीला राजकीय अस्तित्व आणि मान-सन्मानाचा प्रश्न असे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या साऱ्या युद्धाचे धुरीण ठरणार आहेत ३७०७ मतदार, ज्यांच्या एका बटनावर संपूर्ण समीकरण बदलू शकते. दोन्ही गटांनी घर-घर मतांची मोजदाद करून काटेकोर रणनीती आखली आहे.
निवडणुकीची घोषणा होताच, नगरपरिषदेनंतर दोन्ही गटांचे लक्ष बाजार समितीकडे केंद्रित झाले.
सुरुवातीला कार्यकर्त्यांनी मोर्चा सांभाळला असला तरी, शेवटच्या टप्प्यात आमदार सोपल आणि माजी आमदार राऊत यांनी तडाखेबाज दौरे, गुप्त बैठकां आणि रात्रगाठींचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, व्यापार नियमन पारदर्शक व्हावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम व्हावी यासाठी APMC ही महत्त्वाची संस्था आहे.
या संस्थेवरील नियंत्रणामुळे ग्रामस्तरावरील सहकार, सत्ता समीकरणे आणि पुढील विधानसभा निवडणुकीची पायाभरणी मजबूत होते. म्हणूनच विजयासाठी दोन्ही गटाकडून प्रत्येक शक्य युक्ती आणि डावपेच राबवले जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शेवटचे ४८ तास उरले असताना बार्शी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही गटांच्या दाव्यांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. आता एकच प्रश्न सर्वत्र ऐकू येतो ३७०७ मतदार कुणाला बाजूला करतील? आणि बार्शी बाजार समितीचा ताज कोणाच्या माथी चढणार?
मतदारसंघांचे बदलते गणित
सहकारी संस्था मतदारसंघ (सोसायटी)
तालुक्यातील सहकारी विश्वाशी निगडित १६४३ संचालकांचे मतदान हा या निवडणुकीचा सर्वात मोठा आणि निर्णायक ब्लॉक आहे. त्यामुळे दोन्ही गट या विभागात पूर्ण ताकद झोकून देताना दिसत आहेत.
ग्रामपंचायत मतदारसंघ
ग्रामीण राजकारणाची नाडी जाणणारे १०३९ सदस्य निकालाला वेगळे वळण देऊ शकतात.
हमाल–तोलार मतदारसंघ
बाजार समितीच्या प्रत्यक्ष कारभाराशी जोडलेला १०२५ हमाल व तोलार वर्ग या वेळी निर्णायक भूमिका बजावण्याच्या स्थितीत आहे. हा गटच ‘किंगमेकर’ ठरेल अशी कुजबुज राजकीय वर्तुळात ऐकू येते.















