“गतिमान जगात सकारात्मकता आणि ध्येयवादी दृष्टिकोनानेच घडेल यशस्वी करिअर” : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या अंतर्गत कार्यरत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (SIMMC) आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (SIBMT) यांच्या MCA विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी इन्फोबीन्स फाउंडेशन, नांदे, पुणे येथे उद्योगभेट आयोजित करण्यात आली.
या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना IT उद्योगातील आधुनिक कामकाज, रिअल-टाइम प्रोजेक्ट वातावरण, सॉफ्टवेअर विकास प्रक्रिया, अँजाईल कार्यपद्धती, UI/UX डिझाईन, ऑटोमेशन, AI-आधारित तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांची प्रत्यक्ष ओळख करून देणे होता.
इन्फोबीन्सच्या टीमने विद्यार्थ्यांचे स्वागत करून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकल, प्रोजेक्ट प्लॅनिंग, कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट आणि अँजाईल पद्धतीत प्रकल्प पूर्ण करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवली.
UI/UX विभागाने युजर-सेंटरड डिझाईन, वायरफ्रेमिंग, प्रोटोटायपिंग आणि आधुनिक अॅप्लिकेशनसाठी आवश्यक युजर अनुभव सुधारणा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, ऑटोमेशन आणि AI-आधारित तंत्रज्ञानावरच्या सत्रात उद्योगातील प्रत्यक्ष उदाहरणांसह त्यांचा उपयोग स्पष्ट केला.
उद्योगतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत IT क्षेत्रात आवश्यक तांत्रिक कौशल्ये, मजबूत प्रोग्रामिंगची पायाभरणी, सॉफ्ट स्किल्स, समस्या निराकरण कौशल्ये आणि सातत्याने शिकण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सांगितले की या भेटीमुळे उद्योगात प्रत्यक्ष कसे काम केले जाते, कोणत्या कौशल्यांची मागणी आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे कार्यान्वयन कसे होते, याचा सखोल अनुभव मिळाला.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष व संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना वर्कप्लेस डेमोन्स्ट्रेशन, तांत्रिक मॉड्यूल्स व लायब्ररीजवरील चर्चा, वन-टू-वन संवाद, ट्रेनर्सकडून थेट मार्गदर्शन तसेच इन्फोबीन्स प्रतिनिधींशी MOU आणि प्लेसमेंटविषयक चर्चा करण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना उद्योगाभिमुख करण्यासाठी हा अनुभव अत्यंत उपयुक्त ठरला. सूर्यदत्त परिवाराने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, उद्योग-भिमुख प्रशिक्षण आणि वास्तविक IT कार्यपद्धतीची अनुभूती देण्यास इन्फोबीन्सने दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या उद्योगभेटीचे संकलन प्रा. अमर शिंदे, डॉ. नेहा शहा आणि प्रा. नेहा ढाकोल यांनी केले, तर उद्योगभेट समन्वयक म्हणून डॉ. मनीषा कुंभार यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय प्रभावीपणे केले.
विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकण्याची वृत्ती, बदलांना सामोरे जाण्याची तयारी आणि स्वतःला कौशल्यांनी सक्षम करण्याची मानसिकता आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. आजच्या गतिमान जागतिक वातावरणात यशस्वी होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता आधुनिक कौशल्य आत्मसात करणे तितकेच गरजेचे आहे. सूर्यदत्तमध्ये नवनवीन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















