एकही जागा न गमावता बळीराजा आघाडीची पुनश्च सत्ता : फटाक्यांच्या रोषणाईत जल्लोष
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. यात सर्व १६ जागांवर भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीने विजय संपादन केला. त्यांनी आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडीचा पराभव करत सत्ता कायम राखली. निकाल जाहीर होताच राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.
निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टेबलवर मतमोजणी झाली. १८ जागांपैकी व्यापारी मतदारसंघातील दोन जागांवर राऊत गटाचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाल्यामुळे उर्वरित १६ जागांसाठी रविवारी चुरशीचे मतदान झाले होते. एकूण ९६.९८% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल पुरस्कृत परिवर्तन आघाडी आणि माजी आमदार राजेंद्र राऊत पुरस्कृत बळीराजा विकास आघाडी यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली. मतमोजणीची सुरुवात हमाल–तोलार गटापासून झाली.
यात राऊत गटाचे गजेंद्र मुकटे यांनी ५९३ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ग्रामपंचायत गटातील चार जागांचे आणि नंतर सहकारी सोसायटी गटातील जागांचे निकाल जाहीर झाले. सर्व जागांवर राऊत गटाने आघाडी घेत विजय मिळवला.
निकालानंतर कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढत जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बार्शी बाजार समिती निवडणुकीत माजी सभापती रणवीर राऊत यांचे नियोजन पुन्हा एकदा यशस्वी ठरले. स्वतः उमेदवारी न देता संपूर्ण निवडणूक आपल्या हातात घेतलेल्या राऊत गटाला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला. निकाल लागताच राऊत पिता-पुत्र भावुक झाले—हे अश्रू विजयाचेच नव्हे तर विधानसभा पराभवानंतर परत मिळालेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरले.
उमेदवार आणि पडलेली मते
सहकारी संस्था – सर्वसाधारण
संपत अंधारे – 714
युवराज काटे – 764
अभिजीत कापसे – 798 (विजयी)
नंदकुमार काशिद – 729
अशोक काशीद – 715
विजय गरड – 804 (विजयी)
धर्मराज गाडे – 715
सज्जन उर्फ बाबा गायकवाड – 790 (विजयी)
सुरेश उर्फ संजय गुंड – 815 (विजयी)
रसंपतराव चव्हाण – 712
प्रभाकर डमरे – 898 (विजयी)
मुजम्मील पठाण – 03
राजकुमार पुजारी – 682
यशवेत माने – 813 (विजयी)
रविकांत साबुंके – 711 (विजयी)
सहकारी संस्था – महिला राखीव
मनिषा ताकभाते – 850 (विजयी)
ज्योती पवार – 760
सुमन पाटील – 844 (विजयी)
सुषमा पाटील – 728
सहकारी संस्था – इतर मागास प्रवर्ग
भास्कर काशीद – 772
संजयकुमार माळी – 852 (विजयी)
सहकारी संस्था – विमुक्त जाती/भटक्या जमाती
रामेश्वर पाटील – 829 (विजयी)
सुभाष शेळके – 794
ग्रामपंचायत – सर्वसाधारण
नेताजी घायतिडक – 632 (विजयी)
आबासाहेब जगताप – 362
अजित बारंगुळे – 626 (विजयी)
संतोष शिदे – 5
सौदागर संकपाळ – 333
ग्रामपंचायत – अनुसूचित जाती
विनोद वाघमारे – 396
सतीश हनुमंते – 620 (विजयी)
ग्रामपंचायत – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
बाळासाहेब पिसाळ – 394
सचिन बुरगुटे – 621 (विजयी)
हमाल–तोलार मतदारसंघ
प्रेम बगाडे – 134
अजय भडकवाड – 01
वैभव मांजरे – 04
गजेंद्र मुकटे – 727 (विजयी)















