विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून सुलाखे हायस्कूल, बार्शी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे उपमुख्याध्यापक रामकृष्ण इंगळे यांच्या शुभहस्ते थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. गणित दिनानिमित्त प्रशालेत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गणितीय उखाणे, गणितीय कविता, गणितीय सूत्रे व कोडी, गणित प्रश्नमंजुषा तसेच गणितीय गाणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या पर्यवेक्षिका उर्मिला जावळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण जे. पी. कदम यांनी केले, तर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण महिला शिक्षिकांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, पर्यवेक्षक प्रसन्न देशपांडे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील गणित शिक्षक सूर्यकांत चोरमले यांनी केले, तर रोहित आगरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

















