• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याचे अफगाणिस्तान, हाँगकाँगशी कनेक्शन

December 25, 2025
0
25 12 25 1 1
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

कोंढव्यातील संगणक अभियंत्याच्या लॅपटॉप, मोबाईलमधून माहिती उघड; ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : अल कायदा इन इंडियन सब-कॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कोंढव्यातील संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याचा अफगाणिस्तान आणि हाँगकाँगशी कनेक्शन उघड झाले आहे. विशेष न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला ३ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी मंजूर केली आहे.

एटीएसने पुण्यातील १९ ठिकाणी छापे घालून अनेक देशविरोधी साहित्य हस्तगत केले होते. त्यातून जुबेर इलियास हंगरगेकर (वय ३२) याचे नाव समोर आले. त्यानंतर त्याला पुणे स्टेशन परिसरातून २७ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक साधने जप्त करण्यात आली होती. जुबेर हंगरगेकर यांच्या मोबाईलमध्ये एक पाकिस्तानी क्रमांक आढळून आला होता. जुबेरच्या मोबाईल आणि लॅपटॉपचे फॉरेन्सिक लॅबमध्ये विश्लेषण केल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे जाऊन तरुणांना भारताविरुद्ध भडकाऊ भाषणे केल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. पडघा परिसराला ‘ग्रेटर सिरीया’ अशी ओळख बनविण्याचा काही जणांचा हेतू असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

जुबेर हंगरगेकर याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आरोपीविरुद्ध ३० दिवसांची पोलीस कोठडी मिळू शकते. हंगरगेकर याची यापूर्वी १८ दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे तांत्रिक विश्लेषण बाकी असल्याने एटीएसने पोलीस कोठडीचा अधिकार राखून ठेवत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

त्यानंतर एटीएसने वॉरंट घेऊन जुबेर हंगरगेकर याला बुधवारी विशेष न्यायालयात हजर केले. अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात सांगितले की, जुबेरच्या टेलिग्राम ग्रुपमधील १०२ आयडींपैकी ४ आयपी अ‍ॅड्रेस मिळाले आहेत. त्यातील ३ आयपी अ‍ॅड्रेस अफगाणिस्तानमधील असून १ आयपी अ‍ॅड्रेस हाँगकाँगमधील आहे.

त्याच्याकडील डिजिटल साधनांमधून त्याचे थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क, विशेषतः अफगाणिस्तान, हाँगकाँगशी संबंधित मॉड्यूल आणि पडघा गावाशी जोडलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुबेरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून Al Qaeda in Indian Subcontinent Manifestation आणि Inspire Magazine आढळली आहेत. त्यामध्ये AK-47 संदर्भातील गन स्किल ट्रेनिंगचे फायरिंग फोटो तसेच स्फोटके तयार करण्याची सूत्रे असलेली पुस्तके मिळाली आहेत.

त्याच्या साथीदाराच्या झडतीत १२ मोबाईल, ६ लॅपटॉप, एक पेनड्राइव्ह तसेच २ लाख ३५ हजार रुपये मिळाले. जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये १ टीबीपेक्षा अधिक डेटा असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. त्या विश्लेषणातून मिळालेल्या माहितीसंदर्भात जुबेरची चौकशी करायची असल्याने एटीएसने पोलीस कोठडीची मागणी केली. विशेष न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी त्याला ३ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी मंजूर केली आहे.

सोलापूरात शिक्षण, पुण्यात नोकरी
जुबेर हंगरगेकर हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून गेल्या १५ वर्षांपासून पुण्यातील हिंजवडी आणि कल्याणीनगर येथील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी करत आहे. त्याने सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.ई. पदवी प्राप्त केली. पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करत असतानाच त्याचे मुख्य काम दहशतवादी संघटनांसाठी कट्टरपंथी तरुण तयार करणे व टेलिग्राम ग्रुपद्वारे अतिरेकी सामग्री प्रसारित करणे हे होते. भारतात खिलाफ आणण्याचा आणि शरियत प्रस्थापित करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असे तो तरुणांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होता.

11 1

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 26, 2026
गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणूक

गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणूक

March 26, 2026
चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

March 26, 2026
जमीन आपकी ज़िंदगी का सबसे बढ़िया इन्वेस्टमेंट

खुद की जमीन एक विश्वसनीय व लाभदायक संपत्ति

March 26, 2026
जैनों में उदारता का विस्तार अरिहंत परमात्मा की करुणा का ही परिणाम है – आ. राजरक्षितसूरीजी

जैनों में उदारता का विस्तार अरिहंत परमात्मा की करुणा का ही परिणाम है – आ. राजरक्षितसूरीजी

March 25, 2026
Load More
Previous Post

युवकच घडवतील उद्याचे भविष्य – कॅप्टन आशिष दामले

Next Post

कोंढव्यात अवैध दारू विक्री प्रकरणात १ कोट ८५ लाखांची रोकड जप्त, तिघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta