पर्वती पोलिसांची कामगिरी, बिहारमधील ५ जणांना अटक, अडीच लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवकुमार विनोद साह (वय २१), प्रितमकुमार सुशील साह (वय २३), गोविंद सुशील साह (वय २९), मदन गंगा भगत (वय २३), राजा रामबारानी यादव (वय ३२, सध्या सर्व रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. ग्राम पज गचिया बाजार, ता. गोपालपूर, जि. भागलपूर, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून २० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व पॉलिश करण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
दांडेकर पूल येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाजवळ २१ डिसेंबर २०२५ रोजी दोघा चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून हातचलाखीने दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या होत्या.
या गुन्ह्याचा तपास करताना पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार व अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली.
त्यावरून पोलीस अंमलदार अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, प्रसाद पोतदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी ५ जणांना अटक केली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, इसराईल शेख, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, महेश मंडलिक, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, सूर्या जाधव, स्वप्निल घुगे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, किर्ती भोसले, पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केली आहे.


















