बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात शिवाजी महाविद्यालयाचा सहभाग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीतील एकूण २४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना बार्शी येथील बस स्टँड चौक, पोस्ट चौक, पांडे चौक, भोसले चौक आदी वर्दळीच्या ठिकाणी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक पोलीस अंमलदारांसोबत प्रत्यक्ष काम करण्यासाठी नेमण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून वाहतूक नियमन करत प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण झाली तसेच नियमांचे महत्त्व त्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजले.
रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमन करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला असून, यामुळे त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सदर जनजागृती कार्यक्रम सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोहेकॉ. विलास अडसूळ, पोकॉ. कुमार माने, पोकॉ. लतीफ मुजावर, पोकॉ. निलेश आनंतकवळस, पोकॉ. प्रवीण शहाणे, पोकॉ. शरद वाघमोडे, पोकॉ. हनुमंत चौधरी, पोकॉ. शरद सावळे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. शेख, प्रा. युवराज खुळे, प्राध्यापिका शिल्पा वाघ व विद्यार्थी प्रतिनिधी सोनल जाधव यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला.
महाविद्यालयातील एकूण २४ विद्यार्थ्यांनी स्वतः परिश्रम घेऊन या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वी केला.
















