आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूम नगर परिषदेचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Spread the love

भूम : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भूम नगर परिषदेच्या वतीने ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. नगर परिषदेच्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या समारंभात नगराध्यक्षा मा. सौ. संयोगिता संजय गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्षा सौ. लक्ष्मी प्रशांत साठे, प्रभारी मुख्याधिकारी मा. श्री. प्रवीण जाधव, सर्व नगरसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी वृंद तसेच शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या समारंभात राष्ट्रगीतानंतर उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.