खराडी पोलिसांनी मॉडीफाईड सायलेन्सर बसविणार्या मोटारसायकलींवर केली कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फटाक्यासारखा आवाज करणारा सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणाºया ४५ बुलेटस्वारांना पकडून खराडी पोलिसांनी त्यांचे सायलेन्सर काढून त्याच्यावरुन बुलडोझर फिरवला.
खराडी परिसरात बुलेट मोटारसायकलवरुन फिरणारे तरुण मुले बुलेट गाड्यांना असणारे मुळ कंपनीचे सायलेन्सर बदलुन त्या जागी दुसरे मॉडीफाईड सायलेन्सर बसतात. त्यातून फटाक्याचा मोठा व कर्ण कर्कश असा आवाज येतो. त्यामुळे लोकांना त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.
खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सजंय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अशा मॉडीफाईड सायलेन्सर बसविलेल्या ४५ बुलेट गाड्या व इतर दुचाकी गाड्यांना पकडले. त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई करुन त्यांच्या गाड्यांचे मॉडिफाईड सायलेन्स्र काढून त्या गाड्यांना कंपनीचे मुळ सायलेन्सर बसविण्यात आले. या मॉडीफाईड सायलेन्सर वर भर रोडवर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, नवनाथ वाळके, सचिन पाटील, साहेबराव गुंडाळे, संतोष लवटे, विलास केदारी, अशोक केदार, श्रीकांत कोंद्रे, सुरज जाधव यांनी केली आहे.
उच्छाद मांडणार्या बुलेटस्वारांना योग्य संदेश
मॉडीफाईड सायलेन्सर लावून उच्छाद मांडणार्या बुलेटस्वारांना या कारवाईतून योग्य तो धडा देण्यात आला आहे. भविष्यात खराडी परिसरात मोटारसायकलस्वार फटाके फोडून कर्णकर्णश आवाज करीत असताना कोणी मिळून आला तर खराडी पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी केले आहे.















