• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

४१० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी पोलिसांनी कंबर कसली

February 26, 2026
0
26 2 26 1
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

दंडाचा मेसेज आल्यावर आधी खात्री करा, ती फाईल APK तर नाही : वाहतूक पोलिसांची सूचना

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : तुमच्या वाहनावर वाहतूक दंड केल्याचा मेसेज मोबाईलवर येतो. तुम्ही कधी वाहतूक नियमभंग केला, याचा विचार करत असतानाच त्या मेसेजवर क्लिक करता आणि त्याच वेळी सायबर चोरटे तुमच्या अकाऊंटचा ताबा घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करतात. तेव्हा तुमच्या लक्षात येते की तुमची फसवणूक झाली आहे.

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये पुणेकरांवर वाहतूक नियमभंग प्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. जवळपास ४१० कोटी रुपयांचा हा दंड थकीत राहिला आहे. या दंड वसुलीसाठी वाहतूक विभागाकडून १९ लाख ई-चलनाच्या नोटिसा पाठविल्या जाणार आहेत.

त्यामुळे वाहनचालकांना अनेक नोटिसा मिळू शकतात. अशा नोटिसा आल्यावर ती APK फाईल आहे का, हे अगोदर तपासावे. त्या मेसेजच्या शेवटी ‘APK’ असे लिहिलेले नसेल तरच त्यावर क्लिक करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहतूक नियमभंगाबाबत दंड प्रलंबित असलेल्या वाहनमालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित वाहनमालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे.

जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही, तर संबंधित वाहनचालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्याकडे पाठविण्यात येईल. अथवा संबंधित चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्यात येईल.

नोटीस कशी दिली जाणार?
वाहतूक नियमभंग करूनही ई-चलनाचा दंड न भरलेल्या वाहनमालकांना २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी वाहतूक पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात येणार आहे. ही नोटीस वाहनमालकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर MHPIH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून एसएमएसद्वारे पाठवली जाईल. या कालावधीव्यतिरिक्त वाहतूक पोलिसांच्या नावाने किंवा वाहनावरील दंड भरण्याबाबत येणारा कोणताही मेसेज संशयास्पद समजावा.

दंड भरण्याचा अधिकृत मार्ग
अधिकृत संकेतस्थळ : https://mahatrafficechallan.gov.in
पुणे ट्रॅफिक पोलीस अ‍ॅप (PTP)
जवळच्या वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊन ई-चलन मशीनवर QR कोड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येईल.
सायबर फसवणुकीपासून सावधान
वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाईल पाठविण्यात येणार नाही.
आपला OTP कोणालाही शेअर करू नये.
केवळ नोटीसमध्ये नमूद केलेल्या अधिकृत पेमेंट पद्धतीचाच वापर करावा.
संशयास्पद लिंक किंवा कॉल आल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

मोहिमेचा उद्देश
या मोहिमेचा उद्देश नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे, प्रलंबित दंडाची पारदर्शक पद्धतीने वसुली करणे आणि वाहतूक शिस्त अधिक सक्षम करणे हा आहे. पुणे शहरातील नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे आणि निश्चित मुदतीत दंड भरावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.

1

Latest Articles

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

February 26, 2026
पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

February 26, 2026

इनकी भक्ति से खुलते हैं भाग्य के द्वार !! देवता भी करते हैं वंदना..

February 26, 2026

दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द? सायबर फसवणूक टाळण्यासाठी सूचना जाहीर; OTP कुणालाही देऊ नका..

February 26, 2026
महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे NMMS परीक्षेत दैदिप्यमान यश

महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे NMMS परीक्षेत दैदिप्यमान यश

February 25, 2026
Load More
Previous Post

इनकी भक्ति से खुलते हैं भाग्य के द्वार !! देवता भी करते हैं वंदना..

Next Post

पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

February 26, 2026
पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

February 26, 2026
४१० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी पोलिसांनी कंबर कसली

४१० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी पोलिसांनी कंबर कसली

February 26, 2026
महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे NMMS परीक्षेत दैदिप्यमान यश

महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे NMMS परीक्षेत दैदिप्यमान यश

February 25, 2026
सूर्यदत्ततर्फे प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्रींना ‘ग्लोबल लाईफ टाइम अचिव्हमेंट’ व ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ पुरस्कार

सूर्यदत्ततर्फे प्रेमावतार मैत्रीबोध दादाश्रींना ‘ग्लोबल लाईफ टाइम अचिव्हमेंट’ व ‘ग्लोबल पीस ॲम्बेसेडर’ पुरस्कार

February 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

February 26, 2026
पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

February 26, 2026
४१० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी पोलिसांनी कंबर कसली

४१० कोटींच्या थकीत वाहतूक दंड वसुलीसाठी पोलिसांनी कंबर कसली

February 26, 2026

इनकी भक्ति से खुलते हैं भाग्य के द्वार !! देवता भी करते हैं वंदना..

February 26, 2026

दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द? सायबर फसवणूक टाळण्यासाठी सूचना जाहीर; OTP कुणालाही देऊ नका..

February 26, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

February 26, 2026
पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

पत्नीच्या तोंडावर ब्लँकेट दाबून केला खुन

February 26, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta