• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

भारतची ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’कडे वाटचाल

March 23, 2026
0
23 3 26 11
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सूर्यदत्तमध्ये फार्मा क्षेत्राचे उज्ज्वल भविष्य, औषध साक्षरतेवर भर : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय फार्मसी शिक्षणाचे जनक प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त बावधन येथील ‘बन्सी रत्न ऑडिटोरियम’मध्ये ‘नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे’चे औचित्य साधून एक आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात व दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थ केअर अँड रिसर्च (SCPHR) तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन (NPWA) तसेच असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (‘APTI’) महाराष्ट्र राज्य शाखेचे विशेष सहकार्य लाभले.

फार्मसी क्षेत्रातील नव्या संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकणाऱ्या या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांसह प्राध्यापक, इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली.

यावेळी ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी सुमधुर ‘स्वागत गीत’ सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत जनमानसात जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक नैतिकता रुजवणे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.

‘सूर्यदत्त’मध्ये केवळ पदवीधर निर्माण न करता जागतिक दर्जाचे फार्मासिस्ट घडवण्यावर आमचा भर असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, औषध साक्षरतेचा प्रसार आणि समाजाचे आरोग्य संवर्धन ही या क्षेत्रातील व्यावसायिकांची मोठी सामाजिक जबाबदारी आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात दिग्गज वक्त्यांनी फार्मसी क्षेत्रातील सद्यस्थिती आणि भविष्यातील संधींचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला. डॉ. ए. पी. पवार यांनी, “भारत जेनेरिक औषध निर्मितीत जागतिक स्तरावर ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून कसा उदयाला आला आहे,” याचे विश्लेषण करत विद्यार्थ्यांना जागतिक संधींची कवाडे खुली असल्याचे सांगितले.

डॉ. संतोष वर्मा यांनी ‘फार्मसी शपथ’ आणि शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित केले. अमित झा यांनी व्यावसायिक नैतिकतेची कास धरण्याचे आवाहन करत प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या महान कार्याचे स्मरण करून दिले.

डॉ. महेश बुरांडे यांनी फार्मासिस्टची सामाजिक जबाबदारी आणि ‘जागरूकता यात्रे’ची निकड अधोरेखित केली, तर डॉ. व्ही. एन. जगताप यांनी ‘फार्मालोक’ संकल्पनेच्या माध्यमातून या क्षेत्रातील बदलांचे महत्त्व स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या या अभ्यासपूर्ण संवादामुळे उपस्थितांना फार्मसीच्या बदलत्या विश्वाची नवी दृष्टी मिळाली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात फार्मसी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात आला.यामध्ये डॉ. ए. पी. पवार, अमित झा, डॉ. महेश बुरांडे, डॉ. संतोष वर्मा, डॉ. क्षितिज अग्रवाल, डॉ. सौरभ शर्मा, विवेक सिंह, प्रा. सुनील बकलीवाल आणि डॉ. योगेश बाफना यांचा समावेश होता.

शिक्षण, संशोधन आणि सामाजिक आरोग्य क्षेत्रात दिलेल्या बहुमोल सेवेबद्दल तज्ज्ञांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या प्रतिसादाने आणि टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले होते, ज्यामुळे या सोहळ्याची उंची अधिकच वाढली.

या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डॉ. सारिका झांबड यांनी नियोजनाची महत्त्वाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. सारिका झांबड आणि डॉ. श्रावणी सोमयाजुला यांनी करत आपल्या ओघवत्या शैलीने उपस्थितांची मने जिंकली.

या दिमाखदार सोहळ्याला डॉ. सचिन कोतवाल, डॉ. अमोल शाह, प्रा. प्रवीण जवळे, प्रा. एन. ए. पाटील, प्रा. रणजित टाकळे, आशिष झा, डॉ. परदीप बोडके यांसह औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील अनेक मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. गौरिशंकर स्वामी यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने आणि राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीने दुमदुमून गेला. ज्ञान, प्रेरणा आणि देशसेवेची भावना जागवणारा हा सोहळा सूर्यदत्तच्या परंपरेनुसार शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात अविस्मरणीय ठरला.

आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्टची भूमिका केवळ औषध विक्रीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तो आरोग्य व्यवस्था आणि प्रगत तंत्रज्ञानातील एक अपरिहार्य दुवा बनला आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

March 202610

Latest Articles

माँ की रेसिपी सबसे बेहतरीन इलाज है।

March 23, 2026
Maharashtra News Network Weekly 16 March To 22 March 2026

Maharashtra News Network Weekly 16 March To 22 March 2026

March 23, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 23, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक

March 21, 2026
सूर्यदत्तची ‘फार्मालोक’ यात्रा उत्साहात संपन्न

सूर्यदत्तची ‘फार्मालोक’ यात्रा उत्साहात संपन्न

March 21, 2026
Load More
Previous Post

माँ की रेसिपी सबसे बेहतरीन इलाज है।

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta