• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

April 20, 2026
0
20 04 26 2
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

५३ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा : जयराज क्लबमध्ये कार्यक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.

कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये रविवारी (दि. १९) आयोजित या कार्यक्रमात सुमारे ४० माजी विद्यार्थी सपत्नीक सहभागी झाले होते. शाळेतील खोड्या, एकत्रित अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, शिक्षा आणि स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी पुन्हा एकदा बालपण अनुभवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या दशकात दिवंगत झालेल्या सहाध्यायांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जयराज क्लबची पाहणी करण्यात आली. सर्वांनी एकत्रित समूह छायाचित्र काढून या अविस्मरणीय भेटीची नोंद केली. पुढे संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या बॅचमधील काही विद्यार्थी मुंबई, राजकोट (गुजरात), कॅनडा आणि अमेरिका येथे स्थायिक असून त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. ते संदेश कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आले. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील अनुभव आणि भावना व्यक्त करत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.

या प्रसंगी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शहा म्हणाले, “ज्या शाळेतून मी १९७३ साली एसएससी उत्तीर्ण झालो, त्याच संस्थेच्या चेअरमनपदी २०२२ मध्ये काम करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.” त्यांनी जयराज क्लबच्या उभारणीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच भविष्यात अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित महिलांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचेही नियोजन केले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन डॉ. राजेश शहा, अतुल शहा, वीरेंद्र शहा, रश्मी गांधी, रणजीत पोरवाल, प्रकाश शहा आणि मदन शहा यांनी केले.

26 2725

Latest Articles

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

April 20, 2026
मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

April 20, 2026
वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

April 20, 2026

गंगाधम-शत्रुंजय रस्त्यावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

April 20, 2026
Maharashtra News Network Weekly 13 AprilTo 19 April 2026

Maharashtra News Network Weekly 13 AprilTo 19 April 2026

April 20, 2026
Load More
Previous Post

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

Next Post

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

April 20, 2026
मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

April 20, 2026
पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

April 20, 2026
वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Maharashtra Jain Warta Weekly 11 April To 17 April 2026

Maharashtra Jain Warta Weekly 11 April To 17 April 2026

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

April 20, 2026
मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

April 20, 2026
पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

April 20, 2026
वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा

वेलेंटिना इंडस्ट्रीजचे संचालक संतोष बांदल, ज्ञानेश्वर चोरगेंवर गुन्हा दाखल

April 20, 2026

गंगाधम-शत्रुंजय रस्त्यावर वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

April 20, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

April 20, 2026
मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

April 20, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta