• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Friday, April 24, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
0
FIR
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सोशल मीडियावरील ६ युट्युब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल : ३० लाख विद्यार्थी परीक्षा देतात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) परीक्षेची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरील युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सहा युट्युब चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या डॉ. मनीषा ताठे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून Learn With Me, GK Tracer Official, NP Return Things, Academic Education, Priya Gharat RZP School, Kailas Sir Maths या सहा युट्युब चॅनेलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांचे मराठी, इंग्रजी, गणित या विषयांचे मूल्यांकन करण्यासाठी दरवर्षी या चाचणीचे आयोजन केले जाते. राज्यभरातील शाळा, खासगी अनुदानित शाळांमधील सुमारे ३० लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित झाल्याचे उघडकीस आले.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तसेच गणित, इंग्रजी, मराठी विषयांतील कल जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट ३) ही परीक्षा घेतली जाते.

११ एप्रिल रोजी मराठी भाषेची संकलित चाचणी (प्रश्नपत्रिका क्रमांक १), १५ एप्रिल रोजी गणित विषयाची संकलित चाचणी (प्रश्नपत्रिका क्रमांक २) आणि २२ एप्रिल रोजी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका (क्रमांक ३) घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदे कडून तयार करण्यात येतात.

पुण्यातील एका खासगी मुद्रणालयातून प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. प्रश्नपत्रिका छापल्यानंतर त्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वितरित करण्यात येतात. ही प्रक्रिया गोपनीय असते. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच सहा चॅनेलवर मराठी, इंग्रजी, गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर डॉ. ताठे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.

या प्रकरणी महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या तसेच इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ५ व ६ अन्वये आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका कशा प्रकारे प्रसारित करण्यात आल्या, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.

मुलांचा कल समजणे अवघड
ही परीक्षा विद्यार्थ्यांचा कल कोणत्या बाजूला आहे आणि त्यांना कोणत्या विषयात अधिक समज आहे हे जाणून घेण्यासाठी घेतली जाते. त्याचा त्यांच्या पुढील आयुष्याच्या दृष्टीने तसेच पालकांसाठी मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो. ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित झाली असली तरी त्यातील दोन परीक्षा आधीच पार पडल्या होत्या. तिसरी परीक्षा २२ एप्रिल रोजी घेण्यात आली. प्रश्नपत्रिका आधीच प्रसारित झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांचा खरा कल समजणे अवघड होणार आहे.

26 2747

Latest Articles

JITO Skillsthon Pune-2026 : Title Sponsor – Navitas Solar

April 24, 2026

JITO Skillsthon Pune-2026 Co-Powered By Sponsor – Dal Roti ( Your Trading Buddy)

April 24, 2026
व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

April 23, 2026
नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

April 23, 2026
Load More
Previous Post

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

Next Post

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta