• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
0
mocca act
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी : ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटींची केली होती फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी ९ सायबर गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडील गोठविलेली २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम फिर्यादींना परत मिळवून देण्यासाठी न्यायालयामार्फत आदेश प्राप्त केले आहेत.

अभय बाबासाहेब पाटील (वय ३४, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे (वय ३०, रा. वाघोली), युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार (वय ३५, रा. निंबाळकरनगर, लोहगाव), रॉनी ऊर्फ पंकज मंगू गिरीगोस्वामी (वय २४, रा. भिंडर, जि. उदयपूर, राजस्थान), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (वय २३, रा. ढुंढिया, ता. मावळी, जि. उदयपूर, राजस्थान), उमेश लक्ष्मीलाल भट्ट (वय २१, रा. सदरबझार, भडसोरा, राजस्थान), महेश करबसप्पा उडचणे (वय २८, रा. रावळ पाडा, दहिसर पूर्व, मुंबई), राहुल बहादूरप्रसाद मोर्य (वय २४, रा. रावळ पाडा, दहिसर पूर्व, मुंबई), शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद (वय २६, रा. समतानगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. या गुन्हेगारांना हातकणंगले, मुंबई, राजस्थानमधील उदयपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे.

शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादींना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून, त्या माध्यमातून टोळीचा व स्वतःचा आर्थिक फायदा होण्यासाठी एकत्रित तसेच वैयक्तिकरित्या जाळे उभारले. विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी आमिषे दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आश्वासन देत सर्वसामान्य जनतेची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

टोळीतील सदस्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून फसवणुकीची रक्कम यूएसडीटी (USDT) सारख्या आभासी चलनात वर्ग केली, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.

या गुन्हेगारांनी संघटितपणे पिंपरी चिंचवड, मुंबई शहर आणि मध्य प्रदेशात सायबर फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार दीपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, विनायक म्हसकर, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, सौरभ घाटे, श्रीकांत कबुले, महेश मोटकर, प्रविण शेळकंदे, सोपान बोधवड, सुरज शिंदे, दीपक माने, स्वप्नील खणसे, शिवाजी बनसोडे यांनी पार पाडली.

26 2747

Latest Articles

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

April 22, 2026

वरळी मोर्चामुळे ट्रॅफिक जॅम महिलेचा संताप, गिरीश महाजन यांच्यावर नाराजी

April 22, 2026
Load More
Previous Post

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Next Post

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

April 21, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी म. सा. का देवलोकगमन

April 22, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta