• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026
0
23 4 26 1
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

विवाहाच्या आमिषाने २६ लाखांना गंडा : मॅट्रोमोनिअल साइटवर फेक अकाउंटवरून फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : देशातील नामांकित अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला येरवडा पोलिसांनी अटक केली. आरोपी विवाहविषयक संकेतस्थळावरून महिलांशी ओळख करून त्यांची फसवणूक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

आदर्श प्रशांत म्हात्रे (वय ३४, रा. अलिबाग, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी म्हात्रे स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, जयेश पाटील अशी बनावट नावे सांगून महिलांची फसवणूक करत होता.

याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीची फिर्यादी महिलेशी विवाहविषयक संकेतस्थळावरून ओळख झाली होती. म्हात्रे याने अवकाश संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर त्याने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. महिलेच्या मुलीचा सांभाळ करतो, असे त्याने तिला सांगितले.

त्यानंतर त्याने महिलेकडे मुलीच्या भविष्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्याचे सांगून एका बँकेकडून २६ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढायला लावले. हे पैसे मिळाल्यानंतर त्याने महिलेशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तिने १० जानेवारी २०२६ रोजी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

तपासात म्हात्रे हा वेगवेगळ्या नावांनी महिलांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. तो नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा तपास शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ठाकर करत आहेत.

१०वी पास तोतयावर ११ गुन्हे
आदर्श म्हात्रे याचे १० वीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने वेगवेगळ्या मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर वेगवेगळ्या नावांनी अकाउंट उघडले. लग्नाचे वय उलटून गेलेल्या तसेच विधवा व मुले असलेल्या महिलांना तो लक्ष्य करत असे. त्यांना लग्नाची मागणी घालत आणि नंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळत असे.

या पैशातून तो गोव्याला जाऊन मौजमजा करत असे. त्याला कॅसिनोचा नाद लागला होता. गोव्यातील बिग डॅडी कॅसिनोचा तो गोल्ड कार्ड मेंबर आहे. महिलेकडून घेतलेल्या पैशांपैकी २१ लाख रुपये त्याने याच कॅसिनोच्या खात्यात जमा केले होते.

पोलिसांनी ते २१ लाख रुपये जप्त केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विवाहविषयक संकेतस्थळांवरून महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा संकेतस्थळांवर नावनोंदणी करताना महिलांनी खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

19

Latest Articles

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
Load More
Previous Post

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026
मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

मूल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर प्रसारित

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

९ सायबर गुन्हेगारांवर प्रथमच मोक्का कारवाई

April 22, 2026
तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

April 22, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026

अप्पा बळवंत चौकात थरार PMPML दुकानात घुसली!

April 23, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta