दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यात अनैसर्गिक कृत्याने प्रचंड खळबळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलाला फरफटत नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सागर सोनावणे (वय-21 रा. दांडेकर पूल) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 16 वर्षाच्या पीडित मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडित शुक्रवारी (दि.19) दुपारी दोनच्या सुमारास दांडेकर पुल येथील पीएमटी बस स्टॉपवर मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने पीडित मुलाला बळजबरीने ओढत फरफटत बस स्टॉपच्या पाठिमागे असलेल्या मुतारीत नेले. त्याठिकाणी त्याच्यासोबत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. पीडित मुलाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सोनावणे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्यामार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.














