स्वारगेट पोलिसांत गुन्हा : थेट शोरुममधून लाखाची मोटारसायकल घेऊन ठोकली धूम
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकी घेण्यासाठी तो शोरुमला आला. त्याने एक मोटारसायकल पसंतही केली. त्यानंतर त्याने तेथील कर्मचार्यास गाडीची टेस्ट राइड मारुन परत येतो, असे सांगून गाडी घेऊन गेला. तो पुन्हा परतलाच नाही. शेवटी मोटारसायकलच्या वितरकाने पोलिसांकडे धाव घेतली.
सागर शिंदे याच्यावर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शंकर शेठ रोडवरील कोठारी होंडा शोरुममध्ये शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शोरुमच्या वतीने दर्शन मेहता यांनी फिर्याद दिली आहे. सागर शिंदे असे नाव सांगणारा एक तरुण शोरुममध्ये आला होता. त्याने एक लाख रुपयांची केटीएम मोटारसायकल विकत घ्यायची असल्याचे सांगितले. त्यानंतर गाडीची टेस्ट राइड मारुन परत येतो, असे म्हणून त्याने गाडी घेतली. त्यानंतर तो परत न येता, गाडीचा अपहार करुन फसवणूक केली. गुन्ह्याचा अधिक तपास स्वागरेट पोलिस करत आहेत.














