श्री शिवकृपानंद स्वामीजी करणार मार्गदर्शन : बार्शी शहरातील पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : मानसिक ताण-तणाव आणि कोविड-१९च्या संसर्गाने उद्भवलेली परिस्थिती यावर मात करण्यासाठी ध्यानसाधना या विषयावर ध्यानयोगाचे प्रणेते, परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यान योगावर प्रवचन करणार आहेत.
बार्शी पोलीस व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस व नागरिक यांच्यामद्ये समन्वय साधण्याकरिता आठ दिवशीय हिमालयीन समर्पन ध्यानयोग शिबिराचे आयोजन केले आहे. पोलीस ग्राऊंड, हगरे प्लॉट सिद्धेश्वरनगर, कासारवाडी रोड, बार्शी येथील सभागृहामध्ये २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२१ दरम्यान सकाळी ७ ते ९ या वेळेत शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलीस ग्राऊंड, हगरे प्लॉट सिद्धेश्वरनगर, कासारवाडी रोड, बार्शी येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. कोविड-१९च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शकसूचनांच्या अधीन राहून कार्यक्रम होणार आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.














