सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : तडीपार कायद्याचा भंग केल्याने केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बार्शी, करमाळा, माढा तालुक्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार केले आहे. तडीपार कायद्याचा भंग केल्यामुळे त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
लखन राजेंद्र शिंदे (वय २२, रा. हिगणी, हातीज, ता. बार्शी) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, वैराग पोलीस स्टेशनमधील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक पोलीस तपास सुरू असताना वैराग एस.टी. स्टँड येथे आरोपी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी वैराग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर वैराग, बार्शी शहर तालुका, पोलीस स्टेशनमध्ये जबर चोरी, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापत, मारामारी अशा प्रकारचे गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघडीस आले आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार असून, तो वैराग पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी असून, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्याला बार्शी, करमाळा माढा या तालुक्यातून सहा महिन्याकरिता तडीपार केले आहे.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहायक पौजदार शिवाजी घोळवे, श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर, सलीम बागवान, सचिन गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
