गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कामगिरी : एनडीए गेट नं. १० येथे केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत गुन्हागाराच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केल्या. गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने ही कारवाई केली.
अक्षय दिलीप रावडे (वय २४, रा. उत्सव बिल्डिंग, किरकिटवाडी, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-३ चे पथक उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार एनडीए गेट नं.१० जवळ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ८० हजार ४०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोझा, संजीव कळंबे, कल्पेश बनसोडे, सुजीत पवार, सोनम नेवसे, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, राकेश टेकावडे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
















