हडपसर पोलिसांत गुन्हा : गंगा रेसिडेन्सीमध्ये पायी फिरताना घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वीचे भांडण आणि माझ्याकडे बघून का हसला असा जाब विचारल्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केली. ही घटना हडपसरमधील गंगा रेसिडेन्सीमध्ये २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसहाच्या सुमारास घडली होती.
प्रतिक कांबळे (वय २६), भूषण पटेल (वय २६) आणि प्रमोद कुंभार (वय ४१, तिघे रा. गंगा रेसिडेन्सी, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी आदित्य शिंदे (वय २२, रा. गंगा रेसिडेन्सी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपीचे पूर्वीचे भांडण होते. त्याचा राग मनामध्ये असतानाच फिर्यादी गंगा रेसिडेन्सीमध्ये पायी फिरत होते, त्यावेळी आरोपी तेथून जात असताना फिर्यादी हसले, त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीस लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षिका सुवर्णा गोसावी करीत आहेत.
