अशोक कदम : कॅम्प एज्युकेशनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासला. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपचार करताना अडचणी आल्या. भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत म्हणून रक्तदान ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य म्हणून रक्तदान केले पाहिजे, असा संदेश लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिला.
केअर टेकर संस्था व कमांड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प एज्युकेशन शाळा, बाबाजान चौक, कॅम्प येथे स्वर्णिम विजयी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ५०हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
कदम म्हणाले की, रक्ताच्या विविध घटकांची गरज भासते. एका व्यक्तीने रक्तदान केले, तर कमीत कमी तीन व्यक्तींना रक्तपुरवठा वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.














