सिंहगड रोड पोलिसांची दमदार कामगिरी : एक पिस्टल 2 काडतुस जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील नवले ब्रीज जवळील हॉटेल डेक्कन पॅव्हिलियनजवळ करण्यात आली.
प्रशांत उर्फ बाळा सुरेश कांबळे (वय-24 रा. बाबु भंडारी चौक, आनंदनगर, चिंचवड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शंकर कुंभार व उज्ज्वल मोकाशी यांना माहिती मिळाली की, नवले ब्रीज जवळील हॉटेल डेक्कन पॅव्हिलियन येथे एक तरुण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याचे पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुन व खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड येथे दाखल आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ-३ पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, अमेय रसाळ, किशोर शिंदे, देवा चव्हाण, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, विकास बांदल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















