लोणीकंद पोलिसांची कामगिरी : आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
विक्रम ऊर्फ पिंटू ऊर्फ पिंट्या कोंडिबा राखपसरे (रा. गोल्डन सोसायटी, काळे ओढा, वाघोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, १७ डिसेंबर २०१९ रोजी रात्री दहाच्या सुमारास वाघोलीत दरोडा टाकून फरारी आरोपी राहत्या घरी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार, पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे, महिला पोलीस उपनिरीक्षिका प्रियांका पवार, पोलीस अंमलदार मोहन वाळके, बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, कैलास साळुंके, प्रशांत कर्णवार, विनायक साळवे, समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे, पांडुरंग माने, सागर शेडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.














