सात आरोपींना केले जेरबंद : सोलापूरमधील वडाळा येथे डॉक्टरांना लुटले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : डॉक्टरांना लुटणाऱ्या सातजणांना अटक करून दोन लाख ७५ हजार रुपये जप्त करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये परत देण्यात आली. वडाळा (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे बंदुकीच्या धाकाने लुटण्याचा प्रकार घडला होता.
पोलिसांनी सांगितले की, वडाळा (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथील डॉ. अनिल कुलकर्णी यांना पाचजणांनी अडवून बंदुकीच्या धाकाने एक कोटी रुपये खंडणी मागितली. त्यांच्याकडे जमा असलेली पाच लाख ७० हजार ४२० रुपये व खिशातील १८ हजार रुपये असे एकूण पाच लाख ८८ हजार ४२० रुपये रोख जबरदस्तीने काढून नेले होते. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गु्न्हा दाखल होता.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सात अनोळखींना अटक करून तपास करून आरोपींकडून दोन लाख ७५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये डॉ. अनिल कुलकर्णी यांना सुपूर्द करण्यात आली.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, सहायक पोलीस फौजदार विवेक रांजेकर, पोलीस नाईक श्रीराम आदलिंग, श्रीशैल माळी, पोलीस शिपाई अशोक खवतोडे, विवेक नरळे, महिला पोलिस हवालदार वैशाली कुंभार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
