कोंढवा पोलिसांची कामगिरी : कोंढवा परिसरात दहशत पसरवित होता
महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क
पुणे : खुनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, दमदाटी, लुटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून भिंगार (ता.जि. अहमदनगर) येथे सोडण्यात आले आहे. सुमित ऊर्फ मोन्या काकासाहेब जाधव (रा. गल्ली नं.२३, रिलायन्स टॉवरजवळ, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस हवालदार जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, पोलीस अंमलदार जगदीश पाटील, पोलीस अंमलदार रुपनवर यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून मु.पो. ॲक्ट कलम ५६(१)अ(ब) प्रमाणे प्रसताव पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या कार्यालयात सादर केला. त्यानुसार उपायुक्तांनी गुन्हेगारास तडीपार करण्याचा आदेश देऊन दोन वर्षाकरिता पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले असून, भिंगार (ता.जि. अहमदनगर) येथे सोडण्यात आले आहे.
