पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सन्मान : वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने घेतली दखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात काम करत असताना पती ललित ओसवाल, कुटुंब आणि इतरांनी भक्कमपणे साथ दिली यांचे आभार मानून हा सन्मान सर्वांचा आहे. कोरोनामध्ये केलेल्या कामाची दखल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी घेतली याचा अभिमान वाटत असल्याचे नीना ओसवाल यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस संस्थेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेबूब सय्यद, सचिन ढेरे, ललित ओसवाल आदी उपस्थित होते. यावेळी ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’ने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रमाणपत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांच्या हस्ते निना ललित ओसवाल यांना देण्यात आले.
नीना ओसवाल म्हणाल्या की, कोरोना महामारीमध्ये सर्व पातळीवर निस्वार्थीपणे धान्य, रस्त्यावरील बेघरांना जेवणाचे डबे, राशन किट, मास्क वाटप, आरोग्य शिबिर, रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, कठीण परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये जागा मिळवून देण्याचे काम केले. तसेच, रुग्णांना औषधे मिळवून दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती, त्यामुळे स्वतःच तापुरत्या स्वरूपात कोविड सेंटरमध्ये जागा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. रेमडीसीवर अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सामान्यांची अडचण दूर करण्यासाठी अहोरात्र झटल्या. त्याचबरोबर स्वतः लसीकरणासाठी लोकांची मदत केली, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, निना ओसवाल या ह्युम मॅकहेंरी मेमोरिअल हायस्कूल सॅलसबरी पार्क येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संकट काळात सर्वांनी आपापल्या परीने इतरांना मदत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.















