प्रगती फांउडेशन : नागरिकांचे होत आहेत हाल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात बंद झालेल्या आंबामाता मंदीर व खंडोबा मंदीर पर्यंतच्या पीएमटी सेवा तातडीने सुरु करण्यासाठी प्रगती फांउडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांच्या नेतृत्वाखाली नागरी आंदोलन करण्यात आले.
प्रचंड लोकसंख्या असलेल्या या भागात फार कमी पीएमटी येतात. त्यामुळे नागरीकांना सुमारे एक किलोमीटर अप्पर डेप्पो पर्यंत पायी जावे लागते. यामध्ये विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व महिलांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे तातडीने या भागात लहान पीएमटीच्या गाड्या सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगीतले की, सत्ताधारी पक्षाने या भागावर नेहमीच अन्यायाची भूमिका घेतली आहे. बजेट कमी देणे, भागातील अनेक विकासकामे रखडवणे हे प्रकार सुरु आहेत. मात्र आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून या भागात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. व पुढील काळात या भागाचा कायापालट झालेला सर्वांना दिसेल. सत्ताधारी पक्षाने नागरिकांचे हाल करणारे राजकारण थांबवावे. अन्यथा पुढील आंदोलन हे आणखी तीव्र करण्यात येईल. प्रतीक कदम यांनी पीएमपीएलचे दत्तात्रय झेंडे यांना याबाबत निवेदन देऊन तातडीने सुखसागर भागात पीएमटी सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे.















