सत्र न्यायाधीश : स्वारगेट पोलिसांत केला होता गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपीची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सहायक सत्र न्यायाधीश राजेश खोमणे यांनी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
सुमित गौतम सोनावणे (वय-31. रा हरकानगर, भवानी पेठ, पुणे) असे निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी सुमित सोनावणे याच्या विरुद्ध 2009 मध्ये वाहतूक पोलिसांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपीने पुरम चौकातील पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप होता. आरोपीच्या वतीने ॲड. मिथुन एस. चव्हाण यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने सर्व साक्षीदार तपासून आरोपी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून सुमित सोनावणे याची निर्दोष मुक्तता केली.















