स्वारगेट पोलिसांत फिर्याद : जेधे चौकात ९ जानेवारी २०२२ रोजी घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून ब्लेडने वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास अटक केली असून, एका फरारीवर गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट येथील जेधे चौकात ९ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली.
कुलदीप अनिल मेश्राम (वय ३०, रा. मिलिंदनगर, तांदूर रेल्वे, जि. अमरावती) असे अटक केलेल्याचे नाव असून, एका फरारीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पायी जात असताना अटक आरोपी आणि त्याच्या साथीदाराने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने सॅक बॅग हिकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने प्रतिकार केल्याने ब्लेडने फिर्यादीच्या गालावर, मानेवर, दंडावर मारून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. कांबळे पुढील तपास करीत आहेत.
