हडपसर पोलिसांत दोन फरारींवर गुन्हा : मांजरी बुद्रुक येथील भापकरमळामधील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : स्वामी समर्थ मंदिरातील दानपेटीमधील पैसे चोरणाऱ्यास अटक केली असून, दोन साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. मांजरी बुद्रुक येथील भापकर मळा येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये ८ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
चेतन किसन साळुंखे (वय २६, रा. नवीन सोलापूर रोड, सरगम चौक, पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव असून, दोन फरार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी निलेश भाले (वय २५, रा. मांजरी बु।।, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मांजरी बु्।। भापकर मळा येथे स्वामी समर्थ मंदिर कुलूप लावून बंद होते. ८ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नागरिकांनी पूजाऱ्यास चोर आल्याचे मोठ्याने आवाज देऊन सांगितले. यावेळी पुजारी व त्यांचे मामा बाहेर आले, तर अटक आरोपी व त्याचे साथीदार मंदिराचे कुलूप उघडून दानपेटीतील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. जी. शिंदे पुढील तपास करीत आहेत.
