डेक्कन पोलिसांत फिर्याद : हेअर आर्टच्या कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन जिमखान्यावरील एका पॉश लेडिज सलूनमध्ये तरुणी गेली असताना तेथील कर्मचाऱ्याने मानेचा मसाज करताना लज्जास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मंदार साळुंखे या कर्मचाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट येथे गेल्या होत्या. तेथे काम करणारा मंदार साळुंखे या तरुणाने फिर्यादीच्या मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी त्यांनी मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला. नको तेव्हा हात लावून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.
















