समर्थ पोलिसांची कामगिरी : भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीसमोर केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकी चोरणाऱ्यास १२ तासांत जेरबंद करून दुचाकी जप्त केली. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भवानी पेठेतील वॉचमेकर चाळ येथे संशयावरून दुचाकीचोराला पकडले.
सोहेल समीर शेख (वय २४, रा. न्यू नाना पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, होंडा कंपनीची ॲक्टिवा मोपेड दुचाकीचा तपास सुरू असताना विना क्रमांकाची दुचाकी वॉचमेकर चाळ, भवानी पेठ येथे दिसली. संशयावरून त्याला थांबवून गाडीचे कागदपत्राविषयी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, त्याला समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर, फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे, नीलेश साबळे, श्याम सूर्यवंशी, शुभम देसाई, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
