भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : अपर डेपो, लेकटाऊनजवळ घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोयत्याचा धाक दाखवित शिवीगाळ करून लुटणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले. कात्रज चौकातून अप्पर डेपोकडे जात असताना लेकटाऊनजवळ ही घटना घडली होती.
अब्दुल मामू शेख (वय १९, रा. गल्ली नं.२२, शिवरायनगर, पासलकर चौक, अप्पर, पुणे), तेजस दीपक सणस (वय १९, रा. सणसनगर, गुजर-निंबाळकरवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी आनंद दरगडे (वय २९, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कात्रज चौकातून अप्पर डेपोकडून लेक टाऊनकडे फिर्यादी मित्राबरोबर मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी दोन आरोपींनी शिवीगाळ करीत कोयत्याच्या धाकाने जबरदरस्तीने मोबाईल व खिशातील पाचशे रुपये काढून घेतले. यावेळी दुकानदार आणि जमलेल्या नागरिकांना दमदाटी करून दहशत निर्माण करून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पुढील तपास करीत आहेत.
