हडपसर पोलिसात फिर्याद : भोसले गार्डनसमोरील रस्त्यावर झाली मोबाईल चोरीची घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पादचारी महिलेच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील भोसले गार्डनसमोर २२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोबाईल चोरी झाली.
काळेपडळ (हडपसर) येथील ३० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हडपसरमधील भोसले गार्डनसमोरून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसका मारून चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
