सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : एक लाख रुपयांचा देशी-विदेशी दारू-बिअर जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अवैधरित्या हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारू व बिअर विकणाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा विभाग पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी चिंबळी फाटा (ता. खेड, जि. पुणे) येथील हॉटेल पायलवर कारवाई करून सहा हजार ५० रोख व एक लाख तीन हजार २४७ रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या जप्त केल्या.
हॉटेल चालक-मालक संदीप मारुती बग (वय ३९, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे), राजू सामसार गौतम (वय ३०, रा. विठ्ठलनगर, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) आणि एका फरारी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा पथक तपास करीत होते. त्यावेळी चाकण पोलीस स्टेशनअंतर्गत म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये हॉटेलमध्ये विनापरवाना देशी-विदेशी दारू व बिअरची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभाग पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, अमोल साडेकर, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, अतुल लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.