कोंढवा पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शेजारी राहणार्या १० वर्षाच्या मुलीला दुकानातून पत्ते आणायला सांगून, ती पत्ते घेऊन आल्यावर तिला घरात घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
लक्ष्मी नगरमधील एका ३५ वर्षाच्या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा लक्ष्मीनगरमध्ये रहायला आहे. त्यांच्या गल्लीत राहणार्या एका १० वर्षाच्या मुलीला त्याने दुकानातून पत्ते आणायला सांगितले. तिने पत्ते आणून त्याच्याकडे देत असताना त्याने तिचा हात पकडला व तिला घरात ओढून घेतले. दाराला आतून कडी लावून तिचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध केला. या मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे तपास करीत आहेत.
