गुन्हे शाखेच्या युनिट-५ची कारवाई : जबरी चोरीचे 4 गुन्हे उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या एकट्या व्यक्तीला हेरुन त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरणाऱ्या रेकॉर्डवरील दोन चोरट्यांना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-६ने अटक केली आहे. आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आले असून, पोलीसांनी 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुण्यातील कोंढवा येथील कपिलनगर येथील मोकळ्या जागेत केली.
समीर उमर शहा (वय-25 रा. खोपडे नगर, गुजरवाडी रोड, कात्रज, मुळ रा. मु. पो. कोलापाटी, मानवत रोड, ता. जि. परभणी, गणेश महादेव अवचारे उर्फ पाटील (वय-27 रा. खोपडे नगर, कात्रज, मुळ रा. देवडीगाव ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट-५चे पोलीस कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील फरार सराईत मोबाईल चोर कोंढवा येथील कपीलनगर येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबाईल हॅन्डसेट मिळाले. पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, पैशांची गरज असल्याने त्यांनी एकट्या व्यक्तीला हेरुन त्यांच्याकडील मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली दिली.
कोंढवा पोलीस ठाण्यातील तीन, तर सिंहगड पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर कोंढवा, बिबवेवाडी आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात आरोपी फरार असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,
सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, अमंलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, आश्रुबा मोराळे, अजय गायकवाड, महेश वाघमारे, दिपक लांडगे, प्रविण काळभोर, विशाल भिलारे, विनोद शिवले, अकबर शेख, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, विलास खंदारे, अमर उगले, दत्ता ठोंबरे, स्वाती गावडे, स्नेहल जाधव, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
