अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्यास अटक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बावधनमध्ये आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
निखिल विलास भालशंकर ( वय -३०) असे आरोपीचे नाव असून, तो झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी करतो. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, बावधन येथील एका सोसायटीमध्ये आरोपी निखिल विलास भालशंकर हा फूड डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता. त्याच वेळेस त्या सोसायटीमध्ये राहणारी आठ वर्षी मुलगी खेळून घरी परतत होती. तेव्हा, आरोपीने तिला थांबवून हाताने अश्लील कृत्य करत हस्तमैथुन करण्यास सांगितले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार मुलीने घरी सांगितला. घरातील व्यक्ती आणि इतरांनी आरोपीचा शोध घेतला पण तो पसार झाला होता. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेमध्ये आरोपी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय असल्याचं पुढे आलं. त्यानंतर आरोपीला पुन्हा बोलावून त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे पुढील तपास करीत आहेत.















