गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : संशयावरून तपास केला असता चोरी केल्याची दिली होती कबुली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरकाम करणाऱ्या महिलेने नऊ लाखांचे दागिने रोख रक्कम चोरणाऱ्या पती-पत्नीला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. फिर्यादीने तिच्या नवऱ्यासमोर चौकशी केली असता, घेतलेला माल परत करतो असे सांगितले. मात्र, तो देण्यास टाळाटाळ केल्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
डेक्कन पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपी एमआयटी कॉलेजमागे एक सोसायटीजवळ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना संशयावरून ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
अश (वय २५), मयुरेश लहु तोडकर (वय २५, रा. मामासाहेब मोहोळ शाळेसमोर, केळेवाडी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी दोघांना डेक्कन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, मीना पिंजण, शशिकांत दरेकर, अजय जाधव, महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















