हडपसर पोलिसांत फिर्याद : फुरसुंगी रेल्वेगेटजवळील कामठेवस्तीमध्ये झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बंद घराचे कुलूप उचकटून एक लाख ७०हजार रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. फुरसुंगी रेल्वेगेटजवळील कामठेवस्ती येते ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेअकराच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.
सौरभ कामठे (वय २६, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कामठेवस्ती (फुरसुंगी रेल्वेगेटजवळ, हडपसर) येथील फिर्यादीचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील कापून एक लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. थोरात पुढील तपास करीत आहेत.

 
			

















