दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : स्कॉर्पिओसह चार दुचाक्या ताब्यात
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
चारचाकी आणि दुचाकी वाहने चोरणार्या दोघा वाहनचोरांना दत्तनगर पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओ
आणि चार मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.
पर्वती परिसरात या दोन वाहनचोरांना पकडले असून, ते बनावट चावीचा वापर करून चोरी करत असत. राजू ऊर्फ गुड्या मधुकर पवार आणि महमद ऊर्फ महाद्या अन्वर शेख (दोघांचे वय 19 , दोघेही रा. ढोक बाबुळगाव, ता. मोहोळ. जि. सोलापूर) अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून कात्रज येथून चोरलेली एक स्कॉर्पिओ, तसेच वेळू, थेरगाव, म्हात्रेपूल आणि गोपाळपूर येथून चोरलेल्या चार मोटरसायकली असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अटक झालेले दोन्ही आरोपी हे मूळचे सोलापूर येथील असून त्यांच्यावर यापूर्वी हडपसर, माळशीरस व पंढरपूर भागात वाहनचोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार कुंदन शिंदे हे करीत आहेत.
