लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडी येथील संदीप नर्सरी येथे घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पहिल्या पतीच्या मुलाला पैसे का पाठवते या कारणावरून भांडण करीत तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सोरतापवाडीतील संदीप नर्सरी येथे १३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
गोमती भोपाली केवट (वय ४९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मुरली चैनू केवट (वय ३६, रा. सध्या- संदीप रोझ नर्सरी, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळगाव- शिवपुरी, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अमर पांगारकर (वय ४७, रा. महादेवनगर, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या नर्सरीमध्ये गोमती भोपाली केवट (वय ४९) आणि तिचा पती मुरली चैनू केवट (वय ३६) दोघे काम करत होते. मूळ गावी पहिल्या पतीच्या मुलाला कामाचे पैसे का पाठवते या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडणाच्या रागातून त्याने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केले. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
