लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीतील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारच्या धडकेत सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी येथे १३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला.
आरोही जीवन काळभोर (वय ६, रा. काळभोर वस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी योगेश काळभोर (वय ३१) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कुंजीरवाडी येथील काळभोरवस्ती येथे आरोही खेळत होती. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावरून भरधाव वेगातील कारची जबर ठोस बसल्याने ती गंभीर जखमी झाली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोरे पुढील तपास करीत आहेत.
