हडपसर पोलिसांत फिर्याद : लक्ष्मी कॉलनीतील समर्थ हाईट्समध्ये झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून २५ हजार रोख आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यासह दोन लाख ५९ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. हडपसर लक्ष्मी कॉलनीमध्ये १४ मार्च २०२२ रोजी सकाळी साडेदहा ते सांकाळी सातच्या दरम्यान चोरीची घटना घडली.
शशिभूषण होले (वय ४४, रा. लक्ष्मी कॉलनी, १५ नंबर, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, समर्थ हाईट, लक्ष्मी कॉलनी, हडपसर येथील फिर्यादीचा फ्लॅट कुलूपबंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप उचकटून २५ हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षिका सुवर्णा गोसावी पुढील तपास करीत आहेत.
