दत्तवाडी पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या : जनता वसाहतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपटामध्ये रस्त्याने जाणार्या तरुणीवर गुंडांचे टोळके येऊन छेडछाड करतात. त्यांचा म्होरक्या भर रस्त्यावरुन तिला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करतो, असे प्रसंग अनेकदा दाखविले जातात. जनता वसाहतीत भरदिवसा हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख (वय २१, रा. कांदेआळी, जनता वसाहत) याला अटक केली आहे. याप्रकरणी १२ वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शेख हा १२ वर्षाच्या मुलीला धमकावून तिच्यासोबत वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता. १७ मार्च रोजी रात्री ही मुलगी घरी जात होती. यावेळी अस्लम शेख याने या मुलीचे तोंड दाबून तिला ओढत जबरदस्तीने आपल्या घरात नेले. घरातील बाथरुममध्ये तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. दत्तवाडी पोलिसांनी शेख याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
